Vidhan Sabha 2019: सकाळीच करा मतदान!

voting
voting

विधानसभा 2019 :

पुणे -  शहर आणि परिसरात उद्या (सोमवारी) दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे मतदारांनो तुम्ही दुपारच्या आतच मतदान करा.

पुण्यात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरीवर सरी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. शनिवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर, रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ३८ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली होती. शहराच्या सर्व भागांत रविवारी सकाळपासून संततधार सरी पडत होत्या. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर दुपारी पुण्यात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, संध्याकाळी पुन्हा हलक्‍या सरींना सुरवात झाली. 

पुण्यात रविवारी रात्री सातला पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत या सरी पडत होत्या. शहराच्या सर्व भागांत हा पाऊस सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत ११ मिलिमीटर आणि लोहगाव येथे १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.  मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या घाटमाथ्यावर पाऊस पडत आहे. पण, पुढील चोवीस तासांमध्ये तेथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ९७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे.

दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम
शहर आणि परिसरात पावसाचा मुक्काम यंदा दिवाळीपर्यंत राहील, अशी शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाला पोषक हवामान सध्या देशात असल्याने पुण्यातही त्याचा प्रभाव जाणवत आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. २६) आकाश अंशतः ढगाळ राहील. सुरवातीच्या दोन ते तीन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्‍यता ५१ ते ७५ टक्के असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यातील रिंगणात...
  तीन मंत्री, चार माजी मंत्री 
  १७ विद्यमान आमदार पुन्हा भविष्य आजमावणार 
  महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह पुण्यातील नऊ नगरसेवक विधानसभेसाठी मतदारांसमोर 
  २१ जागांसाठी २४६ उमेदवार
 जिल्ह्यात ७७.२९ लाख मतदार 

पुणे शहर आणि जिल्ह्यात येत्या सोमवारी (ता. २१) मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता असून, दुपारनंतर त्याचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सकाळपेक्षा दुपारच्या वेळी पाऊस वाढेल.
डॉ. अनुपम काश्‍यपी, हवामानशास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com