पुण्यातील 'त्या' उमेदवाराकडून हिशेब मागायला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

विधानसभा निवडणूक आणि राजकीय धामधूम संपल्यानंतर पुणे शहरातील एका विजयी उमेदवाराने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडे हिशेब मागायला सुरुवात केल्याचे समजते. उमेदवारी मिळविण्यापासून ते विजयापर्यंत कायमच चर्चेत राहिलेल्या या उमेदवाराने हिशेबाचा ताळमेळ घालायला सुरुवात केल्याने पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे.

पुणे - विधानसभा निवडणूक आणि राजकीय धामधूम संपल्यानंतर पुणे शहरातील एका विजयी उमेदवाराने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडे हिशेब मागायला सुरुवात केल्याचे समजते. उमेदवारी मिळविण्यापासून ते विजयापर्यंत कायमच चर्चेत राहिलेल्या या उमेदवाराने हिशेबाचा ताळमेळ घालायला सुरुवात केल्याने पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे.

सोशल मीडियातही हा उमेदवार चर्चेत होता. निवडणुकीत विजयासाठी आणि विजयानंतरदेखील या उमेदवाराने केलेल्या गमती-जमती आजदेखील शहरात चर्चेचा विषय बनून राहिल्या आहेत. असे असताना आता या उमेदवाराने निवडणुकीत प्रचारादरम्यान केलेल्या वाटपाचा हिशेब नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडे मागण्यास सुरुवात केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मताधिक्‍य कमी कसे झाले, हे कारण हिशेब मागण्यामागे असल्याचे पक्षातील सांगण्यात आले. त्यामुळे प्रचाराच्या गडबडीत ही लांडी-लबाडी करून या ‘भोळ्या’ उमेदवाराला अप्रत्यक्ष त्रास देणाऱ्यांना या शोध मोहिमेमुळे घाम फुटला आहे.

'ABCD' सोबत या शाळांत 'गमभन'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhansabha election 2019 candidate calculation