आचारसंहितेची भीती; विकासाला गती

Pune-Municipal
Pune-Municipal

'स्थायी'कडून 100 कोटींची कामे मंजूर; ऐनवेळी अनेक प्रस्ताव
पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने स्थायी समितीच्या बैठकीत 120 प्रस्ताव मान्य करून सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रस्ताव ऐनवेळी दाखल झाल्याने त्यावर सविस्तर चर्चा न करता फक्त मंजुरीचा सपाटा लावण्यात आला.

महापालिकेत आज स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर 18 विषय होते. मात्र, शंभरपेक्षा जास्त प्रस्ताव ऐनवेळी स्थायीला सादर करण्यात आले.

गणेशोत्सव संपल्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे महत्त्वाचे व मोठ्या रकमेचे प्रकल्प व टेंडर रखडतील. त्यामुळे प्रशासनाने चपळाईने आज ऐनवेळी प्रस्ताव मंजुरीसाठी आणले. वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी बांधकाम करणे, वडगाव शेरी येथे उद्यान विकसित करणे, येवलेवाडी येथे मुख्य मलवाहिनी टाकणे, या कामांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या, तर अनेक वर्गीकरणेही मान्य करण्यात आली.

या कामांना मान्यता
- कचरा उचलण्यासाठी बीआरसी वाहने भाड्याने घेणे - 10 कोटी
- पुणे मनपाच्या नव्या व जुन्या इमारतींमधील स्वच्छतागृह साफसफाई - 2 कोटी 87 लाख
- बंडगार्डन येथे मुळा-मुठा नदीवरील बंधाऱ्याला लोखंडी गेट बांधणे - 1 कोटी
- वडगाव जलकेंद्रातील पंपिंग स्टेशनची दुरुस्ती - 1 कोटी
- महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये बहुउद्देशीय कामगार पुरविणे - 22 कोटी 7 लाख
- कचरा वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालक घेणे - 14 कोटी 95 लाख

तातडीने मंजुरीसाठी 33 विषय थेट
गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागल्यास पुढील आठवड्यात स्थायी समितीची बैठक होईल की नाही, याची शाश्‍वती नसल्याने आजच्या बैठकीत मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आणण्यात आले. स्थायी समितीमध्ये मंजूर केलेल्या सुमारे 120 विषयांपैकी 33 विषय हे तातडीने मंजूर करून घेण्यासाठी "वन के' या नियमाचा आधार घेत थेट स्थायीच्या मंजुरीसाठी नेण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com