Vidhansabha 2019 : कॉंग्रेसमधील इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू

Congress
Congress

पुणे - विधानसभा निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे गृहीत धरून, कॉंग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या शहरातील आठपैकी तीन मतदारसंघांतील पक्षाच्या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमधील इच्छुकांनी गाठीभेटींवर भर देण्यास सुरवात केली आहे.

कॉंग्रेसकडे येणाऱ्या तिन्ही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवारी जाहीर होण्यास अद्याप वेळ आहे; परंतु इच्छुकांनी आपली जोरदारपणे तयारी सुरू केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे; तर पुणे कॅंटोन्मेंटमधून माजी आमदार रमेश बागवे, सदानंद शेट्टी; शिवाजीनगरमधून मनीष आनंद, दत्ता बहिरट यांनी सध्या गाठीभेटींवर भर दिला आहे. पक्षाचे आजी-माजी सभासद, आमदार, नगरसेवक, ज्येष्ठ पदाधिकारी यांना भेटून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com