Vidhansabha 2019 : कसबा, शिवाजीनगरमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत 53 इच्छुकांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. सर्वाधिक इच्छुक कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघांमधून असून; तेथे प्रत्येकी 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. तर, पर्वतीमधून तिघांनी उमेदवारी मागितली आहे.

आठ विधानसभा मतदारसंघांतून 53 जणांनी मागितली उमेदवारी
पुणे - शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत 53 इच्छुकांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. सर्वाधिक इच्छुक कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघांमधून असून; तेथे प्रत्येकी 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. तर, पर्वतीमधून तिघांनी उमेदवारी मागितली आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि त्यांचा मुलगा अविनाश यांनी कॅंटोन्मेंटमधून उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत.
कॉंग्रेसची राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीबाबत चर्चा सुरू आहे.

जागावाटपादरम्यान अंदाज यावा, यासाठी कॉंग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. कसब्यातील आमदार गिरीश बापट खासदार झाले आहेत. त्यामुळे कसब्यातील "फाइट' आता सोपी वाटत असल्यामुळे तेथे कॉंग्रेसमधील इच्छुकांनी उचल खाल्ली आहे. रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, विनय ढेरे आदींनी कसब्यातून अर्ज केले आहेत. तर, शिवाजीनगरमध्ये दीप्ती चवधरी, दत्ता गायकवाड, दत्ता बहिरट, मुकारी अलगुडे, मनीष आनंद, गोपाळ तिवारी आदी इच्छुक आहेत.

पर्वतीमधून आबा बागुल, सचिन तावरे, नरेंद्र व्यवहारे यांनी अर्ज भरले आहेत. कॅंटोन्मेंटमधून बागवे पिता-पुत्रासह लता राजगुरू, सदानंद शेट्टी, रवींद्र आरडे आदींनी दावा केला आहे. हडपसरमधून अभिजित शिवरकर, शिवाजी केदारी, प्रशांत सुरसे, प्रशांत तुपे, तर कोथरूडमधून संदीप मोकाटे, प्राची दुधाने आदींनी अर्ज भरले आहेत. खडकवासलामधून श्रीरंग चव्हाण, सचिन बराटे, संग्राम मोहोळ आणि वडगाव शेरीमधून विकास टिंगरे, ज्ञानेश्‍वर मोझे, सुनील मलके आदी इच्छुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Kasaba and Shivajinagar Constituency Congress Party Interested Politics