Vidhansabha 2019 : महाजनादेश यात्रा आज पुण्यात

BJP
BJP

पुणे - भारतीय जनता पक्षाची "महाजनादेश' यात्रा शनिवारी (ता.14) पुण्यात दाखल होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने शहर भाजपमधील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाचा धडाका लावला आहे. पुण्यातील आपले वर्चस्व कायम राखण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

हडपसरमधून शनिवारी सायंकाळी पाच वाजता यात्रेला प्रारंभ होणार असून, त्यानंतर ती पुणे-सोलापूर रस्ता, स्वारगेटहून टिळक रस्तामार्गे नवी पेठ, म्हात्रे पूल भागातून कोथरूडमध्ये पोचेल. त्यानंतर कर्वे रस्त्याने ती फर्ग्युसन रस्त्यावरून शिवाजीनगर मतदारसंघात येणार असून, रात्री आठच्या सुमारास यात्रा वडगाव शेरीकडे रवाना होईल. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत यात्रा विविध मतदारसंघांतून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (ता.15) सकाळी दहा वाजता दांडेकर पूलमार्गे पर्वती आणि खडवासला मतदारसंघातून ती जाणार आहे. यात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे आमदार, खासदार सहभागी होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने महाजनादेश यात्रेचा मार्ग अवलंबला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या यात्रेत केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनाही निमंत्रित करीत प्रदेश भाजपचे नेते शक्तिप्रदर्शन करीत आहेत. त्यात पुण्यातील भाजप नेतेही मागे राहिले नाहीत. सर्वच आठही मतदारसंघांतील आमदारांसह अन्य इच्छुकांनी फ्लेक्‍सबाजी करीत आपल्या उमेदवारीचा दावा केल्याने काही भागांतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाच्या घटनाही घडल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com