इंदापुरात ‘राष्ट्रवादी’तूनच भरणे यांना विरोध

dattatrey-bharane
dattatrey-bharane

इंदापूर/नीरा नरसिंहपूर - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना पुन्हा तिकीट देण्यास तालुका नेते व कार्यकर्त्यांनी विरोध करून भाकरी फिरविण्याची मागणी केली. तालुक्‍यास पाणी देण्यात भरणे अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर स्वकीयांनीच ठेवला. 

आमदार भरणे तुम्ही सर्व पदे भोगली असून, तुम्ही थांबून इतरांना संधी द्या, अशी मागणी केली. या वेळी अप्पासाहेब जगदाळे, माजी तालुकाध्यक्ष अशोक घोगरे, रामभाऊ पाटील यांनी चार दिवसांत उमेदवार नाव निश्‍चित करावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्या अध्यक्षतेखाली सराटी (ता. इंदापूर) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी केली. या वेळी इच्छुक चार जणांनी अप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com