मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिरूरला निवडणुकीचे प्रशिक्षण

प्रा. नागनाथ शिंगाडे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

तळेगाव ढमढेरे (पुणे): शिरूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 2 हजार 477 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिरूर येथे निवडणूकपूर्व प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे व ज्येष्ठ सहकारी सुधीर जोशी यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच कृषी अधिकारी रामभाऊ जगताप यांनी व्हीव्हीपॅट मशिन आणि "ईव्हीएम'चे प्रात्यक्षिक दाखविले. या वेळी तहसीलदार एल. डी. शेख, नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे, अधिकारी दिलीप जाधव, ज्ञानदेव यादव, विजय बेंडभर व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव मारुती कदम यांनी सूत्रसंचालन केले.

पाटोळे म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावून निवडणूक आयोगाला सहकार्य करावे. मतदानापूर्वीचा मॉकपोल सकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 7 ते सायंकाळी सहापर्यंत अशी 11 तास मतदानाची वेळ असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदान पोस्टल बॅलेट पेपरद्वारे करण्याचे आवाहन पाटोळे यांनी केले. येथील विद्याधाम प्रशालेत व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशिनचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhansabha election training at shirur