बारामतीचे विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय देशात पहिल्या 25 क्रमांकात

VP.jpg
VP.jpg

बारामती : केंद्र सरकारच्या अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटच्या देशपातळीवरील मानांकनामध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने पहिल्या 25 मध्ये मानांकन प्राप्त केले आहे.

उपलब्ध साधन सुविधा, उद्योजकतेतील नाविन्यपूर्ण कल्पना,  अभिनव संकल्पनांची जनजागृती,  उद्योजकतेसाठी उद्युक्त करणे,  परिपक्व कल्पनांचे व्यवसायीकरण,  बौद्धिक संपदा हक्क,  आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण,  अभिनव अध्यापन पध्दत , व्यवस्थापनातील कल्पकता आदी निकषावर हे मानांकन प्राप्त झाले आहे. 

 शासकीय व अनुदानित महाविद्यालय गटामध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या निकषांची पूर्तता व्यवस्थापक मंडळ, महाविद्यालयाचे प्रशासन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी एकत्रित पूर्ण केल्याने हे मानांकन प्राप्त झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व विश्वस्त अजित पवार यांनीही प्रोत्साहन दिले आहे. 

कौशल्याधारित शिक्षण पद्धती विकसित करून त्याचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फायदा होऊन देशाचे मनुष्यबळ विकसित व्हावे आणि देशातील विविध नामांकित संस्थामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची निकोप स्पर्धा व्हावी यासाठी देशात शिक्षण मंत्रालयाने ही अटल रँकिंग योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध निबंधाचे सादरीकरण, प्रकाशन, शिष्यवृत्ती, विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन प्रकल्प, स्टार कॉलेज, बी व्होक, या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्यता निधी मिळाला आहे. 
या निधीमधून महाविद्यालयाने अद्ययावत सुविधांनी युक्त मध्यवर्ती संशोधन केंद्र व इंक्युबॅशन सेंटरची निर्मिती केली आहे. 

योग्य निर्णय व दर्जेदार सोयीसुविधांमुळे हे यश मिळाल्याचे समन्वयक नीलिमा पेंढारकर यांनी सांगितले. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, रमणिक मोता, श्रीकांत सिकची, डॉ. राजीव शहा,  ॲड. नीलिमा गुजर,  रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी प्राचार्य डॉ. भरत शिंदे, नोडल ऑफिसर नीलिमा पेंढारकर,  उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे,  डॉ.लालासाहेब काशीद प्राध्यापक व सर्व विद्यार्थ्यांचे देशपातळीवर मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com