उंडवडी सुपे: विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे निर्मल वारी अभियान 

Vidya Pratishthan Colleges Nirmal Vari Campaign At Untavadi Supe Pune
Vidya Pratishthan Colleges Nirmal Vari Campaign At Untavadi Supe Pune

उंडवडी - उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज पालखी तळावर सुपे येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी 'निर्मल व प्लास्टिकमुक्त पंढरीची वारी अभियान' अंतर्गत दोन दिवस स्वच्छता मोहिम राबवून पालखी येण्यापूर्वी व पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर परिसर स्वच्छ केला. 

या अभियानात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळांतर्गत राबविलेल्या या अभियानात सुमारे 150 विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते.

या स्वच्छता मोहिमेमध्ये पालखी सोहळा येण्यापूर्वी व पालखी सोहळा निघून गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी साफसफाई करुन परिसर स्वच्छ केला. विशेष म्हणजे पालखीच्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर विद्यार्थी स्वयंसेवकांनी पालखीतळावरील पत्रावळ्या-कचरा गोळा करून कंपोस्ट खत प्रकल्प कार्यान्वित केला. तसेच प्लास्टिकच्या पत्रावळ्या न वापरणे व पालखीमार्गावर स्वच्छतागृहाचा वापर करणे याबाबत त्यांनी वारकऱ्यांमध्ये प्रबोधनही केले. 

या अभियानाला उंडवडी सुपे ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राहुल पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर नांदगुडे, विद्यार्थी विकास मंडळ समन्वयक प्रा. सुनील भिसे, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग समन्वयक प्रा. दत्तात्रय जगताप, सहकारी प्राध्यापक-प्राध्यापिका, ग्रामस्थ व असंख्य वारकरी- भाविक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी या मोहिमेत सहभागी विद्यार्थी स्वयंसेवकांचे कौतुक केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com