राज्य सरकारी बॅंकेच्या प्रशासकपदी अनास्कर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

पुणे - राज्यातील सहकारी पतपुरवठा रचनेची शिखर बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारी बॅंकेच्या प्रशासकपदी राज्य सरकारने विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती केली आहे. अनास्कर हे विद्या सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. 

पुणे - राज्यातील सहकारी पतपुरवठा रचनेची शिखर बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारी बॅंकेच्या प्रशासकपदी राज्य सरकारने विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती केली आहे. अनास्कर हे विद्या सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. 

ते गेली 28 वर्षे सहकारी बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असून, रिझर्व्ह बॅंकेच्या स्थायी सल्लागार समितीवरही बारा वर्षांपासून आहेत. नवी दिल्लीतील "नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स'चे ते उपाध्यक्ष आहेत. राज्याच्या सहकार कायद्यात दुरुस्त्या सुचविणाऱ्या समितीचेही ते उपाध्यक्ष होते. सहकारी बॅंक क्षेत्रातील अनुभवाचा विचार करून सहकार खात्याने त्यांची राज्य सहकारी बॅंकेवर नियुक्ती केल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. प्रशासकांच्या मदतीसाठी संजय भेंडे आणि अविनाशा महागावकर यांची समिती नियुक्त करण्यासही सहकार खात्याने मान्यता दिली आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेपुढील आव्हाने आणि कामाची पुढील दिशा सांगताना अनास्कर म्हणाले, ""राज्यातील साखर उद्योग खूप अडचणीत आहे. सर्वच कारखान्यांना अपुऱ्या दुराव्यामुळे (शॉर्ट मार्जिन) हंगामपूर्व कर्जपुरवठा करण्याची मोठी जबाबदारी या बॅंकेवर आहे. साखरेचे दर प्रतिक्‍विंटल साडेतीन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांवर आल्यामुळे त्यांची सगळी खाती अनुत्पादक (एनपीए) झाली आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकेचे नियम पाळून कारखान्यांना कर्ज पुरवठा करणे आणि गळीत हंगाम सुरू ठेवणे हे मोठे आव्हान बॅंकेपुढे आहे. त्यातून प्रशासक मंडळ निश्‍चितच मार्ग काढेल.''

Web Title: Vidyadhar Anaskar Administrator of State Government Bank