महाविद्यालयीन नियतकालिके सकारात्मक : सुहास गरुड

कृष्णकांत कोबल
रविवार, 8 एप्रिल 2018

विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळून त्यांचे लेखन कौशल्य वाढीस लावण्यासाठी विद्यावाहिनी या नियतकालिकाचा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोग होईल, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनी व्यक्त केले.

मांजरी - सध्याच्या काळात युवकांच्या हातात डिजिटल मिडिया आल्याने त्याचे दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील युवकांना अभिव्यक्त होण्यासाठी महाविद्यालयीन नियतकालिके सकारात्मक भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळून त्यांचे लेखन कौशल्य वाढीस लावण्यासाठी विद्यावाहिनी या नियतकालिकाचा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोग होईल, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘विद्यावाहिनी’ या नियतकालिकाचे प्रकाशन गरुड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश घुले, उपाध्यक्ष अॅड. महादेव वाल्हेर, विद्यावाहिनीचे संपादक डॉ. नाना झगडे, सुनील बनकर, विकास रासकर, नगरसेविका हेमलता मगर, रुपाली चाकणकर, डॉ. शोभा पाटील, भारती शेवाळे, राहुल शेवाळे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन प्रा. अनिल जगताप,  संपादक मंडळातील सदस्य डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. सविता सिंग, प्रा. भागवत भराटे, प्रा, सुवर्णा यादव, संदीपान पवार, प्रा. नितीन लगड, एम, एन कदम, नम्रता बल्हाळ आदी उपस्थित होते. ‘विद्यावाहिनी’ या नियतकालिकाच्या मुखपृष्ठ हे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणारे आहे. महाविद्यालयातील प्रत्येक शाखेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना त्यामध्ये अविष्काराची संधी देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयातील खेळाडू, कलाकार, व्याख्याते व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, यशस्वी माजी विद्यार्थी यांचाही समावेश करून गौरव करण्यात आला आहे, अशी माहिती संपादक डॉ. नाना झगडे यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidyavahini Magazine Inauguration By Suhas Garud