विघ्नहर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचा उच्च साखर उतारा विभागातील देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पत्रकारांना दिली. 

राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या वार्षिक सभेत नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे येत्या 10 सप्टेंबरला समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. विघ्नहर कारखान्याने गाळप हंगाम 2017-18 मध्ये तांत्रिक कार्यक्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करून 10 लाख 50 हजार 450 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 12 लाख 34 हजार 700 क्विंटल साखर उत्पादन केले. साखर उतारा 11.75 इतका राखण्यात यश मिळविले. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 4 कोटी 40 लाख 60 हजार युनिट वीज निर्मिती केली.

डीस्टीलरी प्रकल्पातून 55 लाख 25 हजार 500 लिटर्स अल्कोहल व 11 लाख 21 हजार 335 लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्यात आली असल्याचे शेरकर यांनी स्पष्ट केले. कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित केलेल्या कामाची ही पावती असून कारखान्याचे कामकाज हे पारदर्शकपणे व सचोटीने करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: vighnahar sugar factory gets first price in the country