पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून सतर्कतेचे आदेश

गणेश बोरुडे
सोमवार, 16 जुलै 2018

तळेगाव स्टेशन - गेल्या अठ्ठेचाळीस तासांत पुणे जिल्ह्यात सर्वदूर चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पुणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यांनी आपत्कालीन साधनांसह तयार राहावे. डोंगर तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातर्फ़े जारी करण्यात आले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे डोंगर पठारावरील आणि डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांना आणि राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणांची पातळी वाढत चालली आहे. काही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.धरणातून पाणी सोडल्यामुळे तसेच ओढ्या नाल्यांतील पाण्यामुळे पूर येऊन, नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यानुषंगाने पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपले पोस्टला आपत्कालीन साधने तयार ठेऊन, जवानांना सतर्क ठेवावे.तसेच नदीकाठच्या गावांना, वस्त्यांना सावधानतेचा इशारा देऊन सतर्क करावे. पूरनियंत्रण योजनेप्रमाणे कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे ग्रामीणच्या सुरक्षा शाखेतर्फे सोमवारी (ता.१६) दुपारी काढलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

Web Title: Vigilance orders from Pune Rural Superintendent of Police