उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्तपदी विजय मंगलानींची नियुक्ती

दिनेश गोगी
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

उल्हासनगर : एका बांधकाम व्यावसायिका कडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारण्या प्रकरणी उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांची पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी उचलबांगडी केली आहे. समतानी यांच्याजागी 'टॅक्स' विभागात 15 कोटी वसुलीचा उच्चांक प्रस्थापित करणारे 'नॉन-करप्ट' विजय मंगलानी यांची सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 'नॉन- करप्ट' अशी ओळख असणाऱ्या मंगलानी हे विशेषतः अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळणार की अभय देणार हा उल्हासनगरात चर्चेचा विषय बनला आहे.

नंदलाल समतानी हे प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त असताना त्यांच्या हद्दीत धनवान तलरेजा उर्फ धण्णा हे रिपेरिंगचे अनधिकृतपण 'रिपेअरिंग'चे काम करत होते. हे बांधकाम तोडायचे नसेल किंबहूना वाचवायचे असेल तर त्याबदल्यात 25 हजार रुपये देण्याची मागणी समतानी यांनी धण्णा यांच्याकडे केली होती. शेवटी 20 हजारावर मांडवली झाली. याची तक्रार धण्णा याने 'अँटिकरप्शन ठाणे यांच्याकडे केल्यावर चार दिवसांपूर्वी अँटिकरप्शनचे वरिष्ठ अधिकारी सुरेश अजगावकर यांच्या टीमने नंदलाल समतानी यांना 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली होती. समतानी यांना दोन दिवसांच्या पोलीस कष्टडीत ठेवण्यात आल्यावर त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यावर त्यांच्या जागी विजय मंगलानी यांची नियुक्ती केली आहे. अँटिकरप्शनचा अहवाल प्राप्त झाल्यावर समतानी यांना निलंबित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश पाटील यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Mangalani appointed as Assistant Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation