पुरंदर विमानतळाबाबत माजी राज्यमंत्री शिवतारेंचे शरद पवार यांना पत्र

Sharad pawar and Vijay Shivtare
Sharad pawar and Vijay Shivtare

सासवड - पारगाव वगळून विमानतळ अगोदरच्या नियोजित जागेवरच करा आणि बाधितांना द्यावयाचा मोबदला तत्काळ जाहीर करा. मोबदला पाहून शेतकरी आपला निर्णय घेतील अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना याबाबत शिवतारे यांनी पत्र पाठविले आहे. राजुरी, रीसे, पिसे, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, नायगाव या नवीन गावात विमानतळ केल्यास त्याचा पुरंदरच्या विकासाला फायदा होणार नसल्याने जागा बदलास आपला विरोध असल्याचे शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत तसे पत्रक आज प्रसिद्धीला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवतारे म्हणाले, गायरान जमिनी दोन्ही ठिकाणी किरकोळ स्वरुपात आहेत. वनजमिनी सुद्धा फार मोठ्या नाहीत. याउलट जुन्या गावांमध्ये सन २००१ पासून आजपर्यंत जवळपास ३,५०० एकर जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत. म्हणजेच बाहेरून आलेल्या भांडवलदार लोकांनी किंवा व्यावसायिकांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी लागणार आहेत. नवीन जागेचा हट्ट कायम ठेवल्यास परवानग्या आणि इतर कामात मोठा वेळ वाया जाण्याचा धोका आहे. समृद्धी महामार्गाचे आपल्यासमोर जिवंत उदाहरण असल्याचे सांगत शिवतारे म्हणाले., समृद्धी महार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. पण शासनाने मोबदला जाहीर केल्यावर त्याच शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येत शासनाला स्वखुशीने जमिनी बहाल केल्या. पुरंदर विमानतळाच्या बाबतीतही शासनाने मोबदला जाहीर केल्यास आणि तो समाधानकारक असल्यास शेतकरी मोठ्या मनाने सकारात्मक होतील, असेही शिवतारे म्हणाले. 

विरोध तर यशवंतरावांनाही चुकला नाही
शरद पवार या यांना लिहिलेल्या पत्रात विजय शिवतारे यांनी., यशवंतराव चव्हाण यांची एक सुंदर आठवण  करून दिली. उजनी धरण उभारताना शेतकऱ्यांनी आणि विशेषतः वारकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. पण यशवंतरावांनी मनोमन पांडुरंगाची माफी मागितली आणि धरण पूर्ण केले. पुढे त्याच उजनी धरणाने सबंध पश्चिम महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकल्याचे शिवतारे यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांसाठी तेवढा त्रास माझ्यासहीत आपल्यालाही सहन करावा लागेल., असेही शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com