विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा : ''येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा कार्यक्रम निर्विघ्नपणे शांततेत पार पडेल.'',असा विश्वास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
   

कोरेगाव भीमा : ''येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभ स्थळी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा कार्यक्रम निर्विघ्नपणे शांततेत पार पडेल.'',असा विश्वास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

गतवर्षीच्या कोरेगाव भीमा परिसरातील दंगलीच्या पार्श्वभुमीवर येत्या एक जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभ स्थळी अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून तयारीचा आढावा घेत संबंधित विभागांच्या जबाबदाऱ्यांबद्दल आवश्यक सुचनाही दिल्या. 

 जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला उपअधिक्षक संदीप जाधव, डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिक्षक सुहास गरूड, प्रांताधिकारी ज्योती कदम, नायब तहसिलदार सुनिल शेळके आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी विजयस्तंभ परिसर तसेच इकडे येणाऱ्या सर्व मार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, अंतर्गत वाहतुक नियोजन, वाहनतळ, वीज व आरोग्य सुविधा, पथदिवे, सिसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त यासह विविध मुद्दयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या कामाबाबत जबाबदारीने लक्ष देण्याचे आदेशही नवलकिशोर राम यांनी दिले. तसेच गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कोणतीही त्रुटी राहु नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत असून

गेल्या दोन महिन्यांपासून बैठका घेत आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व बांधवांना सुविधा पुरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तर स्थानिकांनीही सकारात्मक वातावरणात पाणी व गुलाबपुष्पाने स्वागत करण्याची तयारी केल्याने कोणीच भिती बाळगू नये, असे आवाहनही केले. तर एक जानेवारीला सुरक्षा विषयक कृती आराखडा बनवून नेहमीपेक्षा अनेकपट अधिक पोलिस बंदोबस्त तसेच दोन्ही बाजुला पार्कींग व अंतर्गत वाहतुक सुविधा देण्यात येणार आहे. तसेच जातीय द्वेष पसरविणाऱ्या विघातक शक्तीना रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक काळजीही प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Vijayastambha greetings program will be peaceful: District Collector