डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणातील एका आरोपीने दिलेल्या जबाबात भावेचे नाव आहे. आतापर्यंत झालेल्या तपासातून भावेचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग दिसून येतो.

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याचा जमीन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला.

दाभोलकर हत्या : आरोपी विक्रम भावेच्या जामिनावर आज निकाल 

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणातील एका आरोपीने दिलेल्या जबाबात भावेचे नाव आहे. आतापर्यंत झालेल्या तपासातून भावेचा या गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग दिसून येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भावे याला यापूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा झाली असून तो सध्या जामिनावर आहे. असे असताना त्याचे या गुन्ह्यात नाव आल्याने न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Bhave petition rejected by court in Narendra Dabholkar murder case

टॅग्स