Narendra Dabholkar
Narendra Dabholkar

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाला. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला. 

या प्रकारातील आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांना यापूर्वी जमीन देण्यात आला आहे. अॅड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, असा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे दोघांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com