विक्रम गोखले यांचा बंदिजनांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे - ‘‘बंदिजनांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ‘प्रेरणापथ’ हा उपक्रम करत आहे. देशातील सर्वच कारागृहांसाठी हा उपक्रम आदर्शवत आहे,’’ असे मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

राज्य कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळाच्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पांतर्गत येरवडा कारागृहात बंदिजनांशी गोखले यांनी साधला. या वेळी कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप उपस्थित होते.

गोखले म्हणाले, ‘‘माणूस हा भावनाप्रधान आहे. भावनेच्या भरात माणसाच्या हातून नकळत चुका होतात. तुम्ही सर्वांनी चुका मान्य करून प्रामाणिकपणे शिक्षेला सामोरे गेलात ही चांगली गोष्ट आहे. कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन अनेक गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने फिरत असताना तुम्ही सर्वांनी आपलं वेगळेपण दाखवलं आहे.’’

Web Title: Vikram Gokhale Discussion