कलाकारांनी सिंहावलोकन करावे - गोखले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - ""केवळ हशा, टाळ्यांनी मोठे होता येत नाही. जी भूमिका करत आहोत, ती योग्य आहे की अयोग्य आहे. याचे तटस्थ भूमिकेतून कलाकारांनीच सिंहावलोकन करायला हवे,'' असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. 

संवाद पुणे, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आयोजित संवाद मराठी चित्रपटांचा या चित्रपट संमेलनात राजेश दामले यांनी गोखले यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. आपल्या अभियनाचा प्रवास त्यांनी याप्रसंगी उलगडून सांगितला. अभिनय क्षेत्राबद्दलची मतेही परखडपणे व्यक्त केली. 

गोखले म्हणाले, ""काही माणसे कटू बोलतात; पण त्यांच्यामुळेच आपल्याला एखादी संधी मिळून जाते. दारिद्रयाच्या परिस्थितीत आई-वडिलांच्या संस्कारामुळे मी टिकून राहिलो.'' 

बॅरिस्टर नाटकात नाइलाज म्हणून भूमिका केली, असे प्रांजळपणे कबूल करीत गोखले म्हणाले, ""बॅरिस्टर करताना महाराष्ट्राने मला डोक्‍यावर घेतले होते; पण माझी बिदागी फक्त शंभर रुपये होती. तरीही नाइलाज म्हणून बॅरिस्टरमध्ये भूमिका करत होतो. अभिनयाचे क्षेत्र सोडून मी शेतीसुद्धा केली. माझा प्रेक्षक माझ्यावर आंधळेपणाने, सजगपणाने प्रेम करतो. माझ्याकरिता स्वत-चा वेळ, पैसा खर्च करतो. त्याला अपेक्षित आहे ती गोष्ट मी त्याला देऊ शकलो नाही, तर मी निवृत्त व्हायला हवे, असे मला वाटते. कारण, मी प्रेक्षकांचा आदर करतो.'' 

अभिनयाचे क्षेत्र गंभीरपणे घ्यायला हवे. कारण, फावल्या वेळेत अभिनय करून नट होता येत नाही; पण मुंबईतल्या गतिमान आयुष्यात पैशाच्या मागे आजचे तरुण नट-नटी अक्षरश- धावत आहेत, असेही गोखले म्हणाले. 

टू बी ऑर नॉट टू बी 
""आत्मचरित्र लिहिण्यासाठी स्वत-चे दोष लेखनातून मांडण्याचे धाडस लागते. मी पुस्तक लिहितो आहे, त्यात मला आलेले अनुभव, आलेली समज, पुढच्या पिढीला काय सांगायचे, यावर आधारित हे पुस्तक असेल. त्याचे नाव "टू बी ऑर नॉट टू बी' असे असेल. सध्या मी पुस्तकाचे लेखन करतोय.'' असे गोखले यांनी सांगितले. 

Web Title: Vikram Gokhale interview