स्वच्छता अभियानाच्या बक्षिसात वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

शेटफळगढे - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९ या वर्षात नव्या स्वरूपात राबविले जाणार आहे. आता बक्षिसांच्या रचना बदललेली असून रकमेतही वाढ झाली आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त याची सुरवात होणार आहे. 

यानुसार आता पहिल्यांदाच गावातून १०० गुणांच्या तपासणीतून उत्कृष्ट प्रभाग निवडला जाणार आहे. अशा प्रभागास १० हजारांचे बक्षीसही दिले जाणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषद गटात पहिल्या तीन येणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच, तीन, दोन हजारांचे बक्षीस दिले जात होते. याऐवजी आता केवळ जिल्हा परिषद गटात पहिल्या येणाऱ्या गावाला ५० हजारांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हा स्तरावर पहिल्या तीन येणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच, तीन, दोन लाखांचे, विभाग स्तरावर येणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना दहा, आठ, सहा लाखांचे तर राज्यस्तरावर पहिल्या तीन येणाऱ्या ग्रामपंचायतीना पंचवीस, वीस, पंधरा लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. 

१ मे रोजी अभियानाची घोषणा झाल्यानंतर १५ मेपर्यंत मान्यवरांतर्फे ग्रामस्थांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहेत. येत्या १६ ते ३१ मे दरम्यान सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होऊन यातच अभियानाच्या यशासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. १ ते ३१ ऑक्‍टोबर दरम्यान उत्कृष्ट प्रभाग स्पर्धा होणार आहेत. तर १ ते ३१ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद गट स्तरावरील स्पर्धा होणार असून, यातून प्रत्येक गटातून एका ग्रामपंचायतीची निवड होणार आहे. येत्या १ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान गटात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीची तपासणी होणार आहे. यातून २०० गुणांच्या स्वच्छतेसंदर्भातील मूल्याकंनातून पहिले तीन क्रमांक काढले जाणार आहेत. मात्र, यापैकी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावर आलेल्या पहिल्या दोनच ग्रामपंचायतीचेच १ ते ३१ मार्च दरम्यान विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी मूल्यांकन  होणार आहे. येत्या १ मे ते ३० जून दरम्यान विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मूल्याकंन होणार आहे. या स्तरावर पहिल्या तीन आलेल्या ग्रामपंचायतींचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे. आवश्‍यकता वाटल्यास गावांची १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सरकारकडून पुन्हा तपासणी होणार असून येत्या २ ऑक्‍टोबर २०१९ ला या गावांना राज्य स्तरावरील पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Web Title: Village Cleanliness campaign prize increase