ड्रोनद्वारे होणार गावठाणांची मोजणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणांतील रहिवाशांना आपल्या मालमत्तेची सनद मिळणार असून, जागेसंदर्भातील वाद संपुष्टात येणार आहेत.

पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणांतील रहिवाशांना आपल्या मालमत्तेची सनद मिळणार असून, जागेसंदर्भातील वाद संपुष्टात येणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनच्या वापराचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनच्या वापरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला.  या सुविधेमुळे सर्वसाधारण पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी १५ ते ३० दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या साह्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असे भूमी अभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी सांगितले.

Web Title: Village Counting Survey of India Dron