फ्लेक्समुक्त गावासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे : श्रीगणेश कानगुडे

राजकुमार थोरात
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) : गावातील चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्समुळे गावाचे विद्रुपीकरण होत असून गावकऱ्यांनी ‘फ्लेक्समुक्त गाव’ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी केले.

निमसाखर (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, वीरसिंह रणसिंग, अनिल रणवरे, लालासो चव्हाण, संतोष रणवरे, सुनिल मोरे, विनोद रणसिंग उपस्थित होते.

यावेळी कानगुडे यांनी सांगितले, गावातील चौकामध्ये लावलेल्या फ्लेक्सबोर्डवरील मजकुरावरुन अनेकवेळा तणावाचा वातावरण तयार होते.तसेच फ्लेक्सबोर्डमुळे गाव विद्रुप ही दिसत असते.वाऱ्यामुळे फ्लेक्सबोर्ड पडून अपघात होण्याची शक्यता असते. गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास गाव फ्लेक्समुक्त करण्यासाठी मदत होणार असल्यास फ्लेक्समुक्त गावासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. 

सध्या हिवाळीचे दिवस असून नागरिकांनी चोऱ्या रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. तसेच बाहेरगावी जाताना घरामध्ये मोल्यवान वस्तु, रोख रक्कम,सोन्याचांदीचे दागिने ठेवू नये. प्रत्येक गावामध्ये शाळा-महाविद्यालये असून शाळेमध्ये प्रवेश नसणाऱ्या युवकांनी शाळेच्या आवारामध्ये थांबू नये. शाळेच्या परीसरामध्ये फिरण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या नंबर प्लेटवर नंबर वेडावाकडा टाकण्यात आले असून नंबरमध्येच  दादा, काका, मामा, भाऊ अशी अक्षरे दिसत आहे. वाहनचाकांनी तातडीने परिवहन विभागाच्या नियमानूसार क्रंमाक टाकावे अन्याथा कारवाई करण्याचा इशारा कानगुडे यांनी दिला आहे.

स्वस्ताताील वस्तुंचा मोह टाळा...
सध्या ग्रामीण भागामध्ये स्वस्त (कमी दरामध्ये) चोरीच्या  वस्तु विकण्याचा चोरट्यांचा धंदा सुरु आहे.चोरी वस्तु विकत घेतल्यास कारवाई होण्याची शक्यता असल्याने  नागरिकांनी स्वस्तातील वस्तुंचा खरेदी करण्याचा मोह टाळण्याचे आवाहन केले.

Web Title: villagers should help in flex free village said kangude