टवाळखोरांना आवरा हो! विमाननगरमधील रहिवाशांची पोलिसांना विनंती

viman nagar citizens request to police to control alcoholic goons
viman nagar citizens request to police to control alcoholic goons

वडगाव शेरी(पुणे) : विमाननगर येथील म्हाडा सोसायटीच्या आतील रस्त्यावर अनेक टवाळखोर तरुण घोळक्याने उभे असतात. अश्लील भाषेत शिवीगाळ, उघड्यावर लघवी करतात. अपूर्ण इमारतीत गांजा व दारू पितात. त्यामुळे महिलांना रस्त्याने येणे जाणे अवघड झाले आहे, अशा अनेक तक्रारींचा पाढा स्थानिक रहिवाशांनी पोलिसांसमोर वाचून दाखवला. तसेच या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. विमानतळाकडे जाताना डाव्या हाताला म्हाडा सोसायटी आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी आज विमानतळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी यांची भेट घेऊन वरील समस्या सांगितल्या. यावेळी अरविंद परदेशी, विजय कास्तोडे, अशोक चव्हाण निवृत्त कर्नल रणवीर भल्ला, रामदास शिरसाट, नवनाथ बिक्कड आदी उपस्थित होते.

अरविंद परदेशी म्हणाले, ''म्हाडा सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या हाताला बंद पडलेली इमारत आहे. तेथे अनेक टवाळ तरुण बसून गांजा दारूचे व्यसन करतात. कधी पोलीस आलेच तर हे टवाळखोर आतल्या बाजूला गल्लीमध्ये पळून जातात.''

अशोक चव्हाण म्हणाले, ''रात्रभर सुरू असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या गाड्यांमुळे बाहेरचे अनेक तरुण येथे येतात. शिवीगाळ करतात भांडणे करतात त्याचा त्रास रहिवाशांना होतो. रात्री धंदा करणाऱ्यांना पोलीस येण्याची खबर अगोदरच मिळते.''

वाचा - पुणेकरांनोहेही सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई

रामदास सिरसाट म्हणाले, ''बंद पडलेल्या इमारतीत व्यसन करत असताना या पोरांचे मी मोबाईलमध्ये चित्रण केले आहे. रात्री व्यसन करून ते तरुण येथेच लघवी करतात. रात्री आरडाओरडा करतात . रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोर अश्लील शिवीगाळ करतात.''

पोलीस निरीक्षक मंगेश जगताप म्हणाले, ''म्हाडा सोसायटीत मी स्वतः आणि पोलीस कर्मचारी गस्त करीत असतात. येथे असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन काही गैरप्रकार होत असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. महिलांना त्रास देणाऱ्या आणि रहिवाशांना उपद्रव करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा बंदोबस्त केला जाईल. रहिवाशांच्या सर्व समस्यांची दखल घेऊन टवाळखोरांचा तातडीने बंदोबस्त केला जाईल.'', असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनीही रहिवाशांना दिले.

हेही वाचा - पुणेकरांनो नीट वाचा; असा असणार आहे ‘विकेंड लॉकडाउन’

''टवाळांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी साध्या पोशाखात येऊन कारवाई करावी. पोलिसांची गस्त वाढवावी. सोसायटी प्रमाणेच येथेही गस्तिची नोंद अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केली जावी'', अशी मागणीही रहिवाशांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com