पुणे शहरात नियमांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी

महारेराच्या नियमांचे उल्लंघन करणे, तुकडाबंदी असतानाही दस्तनोंदणी करणे या व अशा अनेक नियमांची पायमल्ली करीत काही हजार दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Stamp Duty
Stamp DutySakal

पुणे - महारेराच्या नियमांचे (Maharera Rules) उल्लंघन करणे, तुकडाबंदी असतानाही दस्तनोंदणी (Stamp Registration) करणे या व अशा अनेक नियमांची पायमल्ली करीत काही हजार दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार (State Government) यावर काय भूमिका घेणार, नियमांचे उल्लंघन केलेल्या उप-निबंधकावर काय कारवाई (Crime) करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Violation of Rules Stamp Registration in Pune city)

बांधकाम प्रकल्पातील सदनिका अथवा दुकाने यांची नोंदणी करतेवेळी दस्तामध्ये महारेरा नोंदणी क्रमांक आहे का, बांधकाम प्रकल्पाला मंजुरी आहे का, यासह जमिनीचे तुकडे करून विक्री केली आहे का, अशा अनेक मुद्यांच्या आधारे ही तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या कामासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावरील दस्तांची तपासणी कमी वेळेत शक्‍य नसल्याने नोंदणी विभागाने तपासणीसाठीची मुदत मध्यंतरी वाढवून मागितली होती. त्यास सरकारने मान्यता दिली असून येत्या ३१ मार्चपर्यंत तपासणी करण्यास मुदत दिली आहे. हे तपासणीचे काम पूर्ण झाले असून त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला असल्याची माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Stamp Duty
12th Exam Cancelled : "बरं झालं, पण पुढच्या परिणामांचं काय?"

शहरातील २७ दस्त नोंदणी कार्यालयापैकी बुहतांश कार्यालयात नियमांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी करण्यात आली असल्याचे या तपासणीत समोर आले आहे. काही कार्यालयांमध्ये २५० हूनही अधिक प्रकरणे अशा प्रकारे केली असल्याचे दिसून आले आहे. चार ते पाच कार्यालयात मिळून सुमारे एक हजाराहून अशी प्रकरणे नियमबाह्य पद्धतीने नोंदणी करून देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नेमके काय घडले...

  • महारेराच्या नियमानुसार पाच गुंठ्यांच्या आतील अथवा आठ सदनिकांच्या आतील प्रकल्पांसाठी नोंदणीची आवश्‍यकता नाही

  • त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या अथवा सदनिका असलेल्या प्रकल्पांना महारेराकडे नोंदणी बंधनकारक

  • अशा प्रकल्पातील सदनिकांची दस्तनोंदणी करताना महारेरा नोंदणी क्रमांकाचा उल्लेख करणे बंधनकारक

  • परंतु सर्रासपणे या नियमांचे उल्लंघन

  • दहा गुंठे, आठपेक्षा जास्त सदनिका असलेल्या प्रकल्पांची दस्तनोंदणी करून देताना सोईस्करपणे त्याकडे डोळेझाक

  • जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असतानासुद्धा एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी केली

Stamp Duty
मायलॅबचे 'कोव्हीसेल्फ' किट विक्रीसाठी उपलब्ध

म्हणून केली तपासणी

पुणे शहरातील एका दुय्यम निबंधक कार्यालयात नियमबाह्यपणे जमिनींची तसेच सदनिकांची दस्तनोंदणी केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी संबंधित दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार मंत्रालयापर्यंत पोचल्यावर महसूल विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी पुणे शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांतील मागील तीन वर्षांतील दस्तांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने तपासणी पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार गेल्या वर्षभरात शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्तांची तपासणी करण्यात आली.

नियमांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी करण्यात आल्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सरकारकडून समिती नेमण्यात आली होती. या समितीने नुकताच त्यांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. नियमांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी केली असल्याची अनेक प्रकरणे या समितीच्या तपासणीतून समोर आली आहेत.

- एक अधिकारी, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com