पुण्यात वाढतोय व्हीआयपींचा राबता

Pune-VIP-Visit
Pune-VIP-Visit

मागील वर्षभरात १,७१५ दौरे; मुख्यमंत्र्यांची २२ वेळा भेट   
पुणे - सांस्कृतिक शहर ते ‘स्मार्ट सिटी’पर्यंतचा प्रवास करणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही वर्षात देशपातळीवरील महत्त्वाच्या (व्हीआयपी), अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा (व्हीव्हीआयपी) राबता वाढला आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये १ हजार ७१५ व्हीआयपी, व्हीव्हीआयपींनी ‘पुणे दर्शन’ केले. ही संख्या २०१७ च्या तुलनेत सव्वा सहाशेहून अधिक आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी तब्बल २२ वेळा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत सात वेळा पुण्याला भेट दिल्याने देशपातळीवर पुण्याला जरा जास्तच महत्त्व येऊ लागल्याची चिन्हे आहेत.

एखाद्या राजकीय पक्षाची प्रचारसभा असो किंवा उद्योग क्षेत्राशी संबंधित कोणताही कार्यक्रम. एवढेच नाही, तर शहरातील एखाद्या शैक्षणिक संस्थेतील पदवी प्रदान सोहळा किंवा छोट्या-मोठ्या विकासकामांपासून ते अगदी मेट्रो, स्मार्ट सिटीसारख्या मोठमोठ्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनांच्या निमित्ताने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाते. त्या दृष्टीने व्हीव्हीआयपी, व्हीआयपी व्यक्तींकडूनही पुण्यातील कार्यक्रमांना झुकते माप दिले जात असल्याची सद्यःस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांवर काहीसे जास्तच प्रेम असल्याचेही त्यांच्या कार्यक्रमांच्या उपस्थितीवरून स्पष्ट होते. फडणवीस यांनी पुण्यातील मंत्र्यांनाही मागे सारत एकाच वर्षात तब्बल २२ वेळा पुण्यातील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावली आहे. मोदी यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पाच वर्षात तब्बल सात वेळा पुण्याला भेट दिली आहे. विशेषतः वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह पंतप्रधान, बडे उद्योजकही पुण्याला भेट देतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाच वर्षातील दौरे
९ ऑक्‍टोबर २०१४-----विधानसभा निवडणूक प्रचारसभा, एच.ए.मैदान
३ जानेवारी २०१५------ज्ञानसंगम बॅर्क्‍स रिट्रीट कार्यक्रम, कोंढवा खुर्द
१४ फेब्रुवारी २०१५-----एमआयडीसी कार्यक्रम, चाकण 
२५ जून २०१६--------स्मार्ट सिटी उद्‌घाटन, बालेवाडी-म्हाळुंगे स्टेडियम
१३ नोव्हेंबर २०१६----आंतरराष्ट्रीय ऊस परिषद व प्रदर्शन, मांजरी
२४ डिसेंबर २०१६----पुणे मेट्रो प्रकल्प उद्‌घाटन, कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर 

२०१८ मधील व्हीआयपींचे दौरे 
राष्ट्रपती    ०२ 
उपराष्ट्रपती    ०३
पंतप्रधान    ०१
राज्यपाल     ०७ 
मुख्यमंत्री    २२
इतर राज्यांचे राज्यपाल    १६ 
केंद्रीय मंत्री    ४८
महाराष्ट्र राज्यमंत्री     १९
इतर राज्यांचे मंत्री     ३८
अन्य व्हीआयपी     ५७
एकूण दौरे     २१३  

शहराला भेट देणारे व्हीआयपी 
२०१४    ४४५
२०१५      ६०५
२०१६     ६४८
२०१७     १,०८६
२०१८    १,७१५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com