चिमुकल्या विराजकडून योगेश सुळका सर

Viraj-Chaudhary
Viraj-Chaudhary

पिंपरी - खेड तालुक्‍यातील वाहागाव व आवळेवाडीदरम्यान असलेला १३० फूट उंचीचा योगेश सुळका (शिंडीचा डोंगर) विराज चौधरी (वय ७) या चिमुकल्याने रविवारी (ता. ११) सर केला. त्याला साह्यकडा ॲडव्हेंचर प्रतिष्ठानच्या श्रीराम पवळे, सुरेश आहिरे, श्रीकांत लोमटे, राहुल खोराटे, महेश वारे, बाबाजी चौधरी या टीमने मार्गदर्शन केले.  

भामा आसखेड धरणाच्या फुगवट्याला लागून असलेल्या आवळेवाडी (कोळीये) आणि वाहागावमधील खिंडीच्या धारेवर हा डोंगर आहे. विराज आत्तापर्यंत वानरटोक, कळकराय, सीतेचा पाळणा या सुळक्‍यांच्या बेसपर्यंत गेला आहे.
रांगणा राजमाची, हरिश्‍चंद्रगड, हर्षगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांची त्याने भटकंती केली आहे. प्रथमच या सुळक्‍यावर चढायचा हट्ट केल्याने इतरांनी त्याला प्रोत्साहन दिले. 

सुळक्‍यावरून रानातील गुरं खूप छोटी दिसली. सुळक्‍यावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून रॅपलिंग करीत खाली उतरलो. हा अनुभवच वेगळा होता. काही ठिकाणी अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करत पुढे गेलो. माझ्या या धाडसामुळे माझे वडील खूप आनंदी झाले आहेत.
- विराज चौधरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com