दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंग तावडेचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तावडेला आज (6 जुलै) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींचा गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याचे प्राथमिक पुरावे तपासातून समोर आले असल्याने त्याबाबत सखोल तपास करणे आवश्‍यक आहे, अन्यथा या पूर्ण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत आणखी विचारवंतांची हत्या होण्याचा धोका कायम आहे. तसेच, तावडेला जामीन दिल्यास पुरावे व साक्षीदारांवरही दबाव येण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

मागील सुनावणीत बचाव पक्षाच्या वतीने एड. समीर पटवर्धन यांनी केवळ संशयावरुन तावडेला अटक केली असून हत्येच्या कटात तावडेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत असा युक्तीवाद केला होता. 6 जुलैला सरकारी पक्षाचा या अर्जावरील युक्तीवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश के. एस. भैसारे यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. 

Web Title: Virendra Tawde bail application is rejected