कौमार्य चाचणीची प्रथा डावलून त्यांनी केला विवाह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पिंपरी - कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करत एका जोडप्याने पोलिस बंदोबस्तामध्ये विवाह केला. त्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी - कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करत एका जोडप्याने पोलिस बंदोबस्तामध्ये विवाह केला. त्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.

ऐश्‍वर्या आणि विवेक या जोडीने कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. कंजारभाट समाजातील या जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून अनिष्ट प्रथांना धुडकावून लावून विवाह केला. काळेवाडी, विजयनगर येथे शनिवारी (१२ मे) हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथेविरुद्धचा लढा देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते कृष्ण इंद्रिकर, केतन घमंडे, भारत तामचीकर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सहा महिन्यांपासून कौमार्य चाचणीविरुद्ध हा लढा सुरू होता. त्यामध्ये या समाजातील अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. समाजाविरुद्ध जाऊन काम करू नये, अशी धमकी या तरुणांना देण्यात आली होती. मात्र, त्यांनी धमक्‍यांना न घाबरता आपला लढा सुरू ठेवून विवाह केला.

Web Title: virginity test marriage police bandobast