Video : शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी होणार 'व्हर्च्युअल क्‍लासरूम'

सकाळ वृत्तसेवा्
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

- शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पाऊल टाकत पुण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (विद्या परिषद) 'व्हर्च्युअल क्‍लासरूम' तयार केली आहे. 
- पुण्या-मुंबईतील शिक्षक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्ही-सॅट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पुणे : शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पाऊल टाकत पुण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (विद्या परिषद) 'व्हर्च्युअल क्‍लासरूम' तयार केली आहे. पुण्या-मुंबईतील शिक्षक आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन व्ही-सॅट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

नंदुरबार, गडचिरोली, नाशिक आणि पालघर या चार आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातील 36 शाळांमध्ये सुरवातीला ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी पुण्यात उभारलेल्या स्टुडिओचे उद्‌घाटन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील, दत्तात्रय जगताप, सहसंचालक राजेंद्र गोधने यावेळी उपस्थित होते. या सुविधेद्वारे इंग्रजी, गणित आणि विज्ञान यांसारखे विषय विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Virtual Classroom to Improve Educational Quality