Sat, Sept 23, 2023

घटनास्थळी विमानतळ पोलिसांनी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.
Pune Crime : धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या
Published on : 24 May 2023, 1:54 am
विश्रांतवाडी : पुणे शहर काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ पदाधिकारी व विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष विकास शिवाजी टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (मंगळवारी) दुपारी घडली.
पोरवाल रोड धानोरी येथील पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, घटनास्थळी विमानतळ पोलिसांनी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.