पैशांसाठी स्वतःला घेतले गाडून!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

विश्रांतवाडी - विश्रांतवाडीजवळील एकतानगर येथे पैसे कमावण्यासाठी स्वतःला चौथऱ्याखाली गाडून समाधी घेण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. 

विश्रांतवाडी - विश्रांतवाडीजवळील एकतानगर येथे पैसे कमावण्यासाठी स्वतःला चौथऱ्याखाली गाडून समाधी घेण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. 

या घटनेत जुबेर सय्यद (मूळ रा. इगतपुरी, नाशिक) याने स्वतःला विटा व सिमेंटच्या चौथऱ्याखाली पाच तास गाडून घेतले. पोलिसांनी त्याला रात्री दहाच्या सुमारास बाहेर काढून त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतले; परंतु नंतर त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले. सय्यद त्याच्या साथीदारांसह गेले ४-५ दिवस एकतानगर परिसरात जादूचे प्रयोग करत होता. येथील मोकळ्या जागेत शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास विटा, वाळू व सिमेंटचा चौथरा त्यांनी बांधला. त्यात त्याने स्वतःला गाडून घेतले. हा प्रकार रात्री दहापर्यंत म्हणजे सुमारे ५ तास चालू होता. ही गोष्ट पोलिसांना समजताच त्यांनी चौथरा फोडून सय्यदला बाहेर काढले.

जुबेर सय्यद जादूचे प्रयोग करत होता. तो आपली कला दाखवत होता. त्याचा फसवणुकीचा कुठलाही उद्देश समोर आला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
- कमलाकर ताकवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Web Title: vishrantwadi pune news money for yourself bury