येरवडा खुल्या कारागृहाला गायी प्रदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

विश्रांतवाडी - विश्वशांतीदूत परिवाराच्यावतीने येरवडा खुल्या कारागृहाला गायी प्रदान करण्यात आल्या. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. लोणीकंद येथील भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद व गोविज्ञान संशोधन संस्था व क्षेत्रपाल प्रतिष्ठान लोणीकंद यांच्या सहकार्याने हे दान देण्यात आले. तसेच डेरा सच्चा सौदा सिरसा संत डॉ. गुरमीत राम रहिम सिंग यांच्या जन्ममहिन्याच्या निमित्ताने संस्थेकडून केळीच्या १५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते व विश्वशांतीदूत परिवाराचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सवणे, कृषिभूषण एकनाथराव कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

विश्रांतवाडी - विश्वशांतीदूत परिवाराच्यावतीने येरवडा खुल्या कारागृहाला गायी प्रदान करण्यात आल्या. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. लोणीकंद येथील भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद व गोविज्ञान संशोधन संस्था व क्षेत्रपाल प्रतिष्ठान लोणीकंद यांच्या सहकार्याने हे दान देण्यात आले. तसेच डेरा सच्चा सौदा सिरसा संत डॉ. गुरमीत राम रहिम सिंग यांच्या जन्ममहिन्याच्या निमित्ताने संस्थेकडून केळीच्या १५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते व विश्वशांतीदूत परिवाराचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सवणे, कृषिभूषण एकनाथराव कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक यू. टी. पवार, उपअधीक्षक दिलीप वासनिक, राजेंद्र लुंकड, डेरा सच्चा सौदाचे सुनील मोरे, गुरू दयालजी, बाळासाहेब पोकळे आदी उपस्थित होते. 

डॉ. जाधव म्हणाले, ‘‘क्रांतिदिनाच्या दिवशी कारागृहात एका क्रांतिकारक कामाला सुरुवात झाली आणि त्यात प्रशासनाला सहभागी होता आले, ही समाधानाची बाब आहे.’’

लुंकड यांनी सेंद्रीय खते व गोशक्तीचे महत्त्व सांगून गोमूत्राचे फायदे, औषधी उपयोग व जागतिक स्तरावर मिळालेले पेटंट यांची माहिती दिली. डेरा सच्चा सौदाच्या कार्यकर्त्यांनी बंदीच्या मुलांसाठी व बंदीजनांना तुरुंगातून सुटल्यानंतर रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अनिल जगताप यांनी आभार मानले.

Web Title: vishrantwadi pune news Provide cows to Yerwada open jail