रस्ता ओलांडणे झाले धोक्‍याचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

विश्रांतवाडी - विश्रांतवाडी, येरवडा परिसरातील रस्ते धोकादायक ठरत असून नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. संगमवाडी-येरवडा-विश्रांतवाडी या बीआरटी मार्गात पादचारी धोका पत्करूनच रस्ता पार करण्याचे धाडस करतात. वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीपुढे नागरिकांना रस्ता ओलांडण्याची सोयच नाही. पदपथांवरच वाहने पार्क केल्याने पदपथही सुरक्षित नाहीत. या भागात बीआरटीचा स्वतंत्र थांबा असल्याने इतर थांबे हटविण्यात आले आहेत; मात्र असे असतानाही बसेस जोडरस्त्याच्या मध्ये थांबून वाहतूक कोंडीत भर घालतात. 

आळंदी रोड पोलिस स्टेशन, शांतीनगर चौक परिसरात कायम वाहतूक कोंडी असते. बीआरटी थांब्यावरच बऱ्याचदा बसेस बंद पडण्याचे प्रकार घडतात. बंद पडलेली बस बाहेर काढण्यासाठीच्या नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी होते. अशीच अवस्था बंडगार्डन चौक ते पर्णकुटी चौकात पाहावयास मिळते. हा परिसरात अपघातप्रवण क्षेत्रच झालेले आहे. वाहतूक शाखेच्या प्रस्तावानुसार सुशोभीकरणाची जागा मर्यादित ठेवूनही प्रश्‍न सुटणार नसून त्याऐवजी पर्णकुटी ते गुंजन चौकापर्यंत आणि इकडे आळंदी रोड पोलिस स्टेशन ते विश्रांतवाडीपर्यंतचा बीआरटीचा स्वतंत्र मार्ग हटवून संपूर्ण रस्ताच दुभाजकांद्वारे सुरक्षित झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी सुटणार आहे. 

यासंदर्भात रहिवासी सुरेश सातपुते म्हणाले, अभियंता विवेक खरवडकर यांनी या समस्यांची पाहणी करून नागरिकांच्या रस्ता सुरक्षितेतचा गांभीर्याने विचार केला जाणार असल्याचे आश्‍वासन दिले होते; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. नागरिकांच्या सोयीसाठी विश्रांतवाडी चौकात स्कायवॉक उभारून पुणेकरांची चेष्टाच केली आहे. गुंजन सिनेमा चौकातूनही प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी अगदी जीव धोक्‍यात घालून कसरत घ्यावी लागते.

Web Title: vishrantwadi road traffic danger