मोहब्बत बॉंटो... मोहब्बत पाओ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - ""पंजाबमधल्या एका गरीब शेतकरी कुटुंबातला मी... तरी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्रात आलो. खरं सागायचं तर माझ्या "पंजाब' या एका आईने मला "महाराष्ट्र' या दुसऱ्या आईकडे जणू हलकेच सोपवलं. मला या महाराष्ट्रभूने माझ्या मायभूमीएवढंच उरीशिरी वागवलंय, हे मी इथे अभिमानाने सांगेन! "जय महाराष्ट्र, जय पंजाब, जय भारत' हा मंत्र आज मला उच्चारावासा वाटतोय...'' अशा शब्दांत बॉलिवूडचे "ही-मॅन' आणि ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

"सरहद' संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनावेळी धर्मेंद्र यांना "विश्‍व पंजाबी गौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी ते भावनिक होऊन बोलत होते. धर्मेंद्र यांच्यासह उज्जाल दोसांज, डॉ. एस. पी. ओबेरॉय, एस. तरलोचन सिंग, रजिया शिंदे, डॉ. केवल धीर, सतनाम मानक, चरणजित कौर नंदा, एस. एस. विर्क, पी. एस. पसरीचा यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. 

धर्मेंद्र म्हणाले, ""पंजाब आणि महाराष्ट्राच्या नात्याचे जे बंध अशा संमेलनांतून निर्माण होताहेत, ते नेहमीसाठीच तसेच राहतील. येणारा इतिहास त्याची साक्ष देणारा असेल. हे नातं हृदयाच्या स्पंदनांप्रमाणेच आहे. लक्षात ठेवा- जेवढे प्रेम वाटाल, तेवढे प्रेम मिळेल!...'' नेकी मेरी शक्ती हैं, ही कविता म्हणत त्यांनी आपल्या मनोगताची सांगता केली. 
 
फडणवीसही माझ्यासारखेच ! 
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यासारखेच दिसायला भोळेभाबडे आहेत; पण आतून मात्र अतिशय कडक शिस्तीचे आहेत,' अशी कोपरखळी मारत धर्मेंद्र यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. त्यांच्या भाषणादरम्यान अनेकदा टाळ्या पडत होत्या. धर्मेंद्र यांनी एक हिंदी कविता ऐकवत आपल्या मनोगताची सांगता केली. 

Web Title: vishwa punjabi sahitya sammelan dharmendra