इंदापूरची प्रतिक्षा करणार अधाेमुख श्‍वानासनमध्ये विश्‍वविक्रम

७५ व्या स्वातंत्र्य वर्षामध्ये ७५ मिनिट ४ सेंकदाचे अधाेमुख श्‍वानासन.
प्रतिक्षा पाटील
प्रतिक्षा पाटीलsakal

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या प्रतिक्षा सुनिल पाटील (Pratiksha Patil) या मुलीने योग-प्राणायामामध्ये गगनभरारी घेतली असून अधोमुख श्‍वानासन ७५ मिनट ४ सेकंद करुन जागतिक विश्‍वविक्रम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये ७५ व्या स्वातंत्र्यच्या वर्षामध्ये ७५ मिनट ४ सेंकदाच्या अधोमुख श्‍वानासनाची नोंद करुन देशवासियांची प्रतिक्षा संपविणार आहे. इंदापूर तालुक्यातील जांब या छोट्या गावामध्ये प्रतिक्षा सुनिल पाटील राहत असून एका शेतकऱ्याची मुलगी आहे.

प्रतिक्षा पाटील
माथेरानला होणार राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा

आई स्वाती व वडिल सुनिल शेतकरी आहेत. ती सध्या वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी शाळेमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिला सुरवातीपासुन योग-प्राणायामाची आवड आहे. अधोमुख श्‍वानासनाची विश्‍वविक्रम सध्या अमेरिकेतील किकी प्लायना (KIKI FLYNN) च्या नावावर असून ६० मिनिट १८ सेकंदाच्या विश्‍वविक्रमाची नोंद असून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तकामध्ये तिची नोंद आहे. तिने १६ ऑगस्ट २०२० साली विश्‍वविक्रम केला आहे. तिच्या आवाहानाला इंदापूर तालुक्यातील प्रतिक्षाने चॅलेंज केले असून आज सोमवार (ता.२४) रोजी ७५ मिनिट ४ सेकंद अधोमुख श्‍वानासनामध्ये थांबून विश्‍वविक्रम करण्याचा प्रयत्न केला. एका शेतकऱ्याच्या मुलीने विश्‍वविक्रमसाठी घातलेली गवसनी कौतुकास्पद आहे.

प्रतिक्षा पाटील
औरंगाबाद आजपासून शहरात धावणार शहर बस

प्रतिक्षाने जिद्द व चिकाटी च्या जोरावर विश्‍वविक्रम करण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ३१ मिनटे अधोमुख श्‍वानासन करता येत होते. मात्र गेल्या दोन महिन्यापासुन नियमित सरावामुळे तिने ७५ मिनिट ४ सेंंकदचा विश्‍वविक्रम करण्याचा प्रयत्न केला. वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, शाळा समितीचे अध्यक्ष आशिष केसकर, उपाध्यक्ष पांडुरंग कवडे यांनी उपस्थित राहुन प्रतिक्षाचे कौतुक केले. शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, ज्ञानेश्‍वर जगताप यांनी प्रतिक्षाचा नियमित सराव घेवून तिला प्रोत्साहन दिले. यावेळी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पतंजली योग समितीचे दत्तात्रेय अनपट, शरद झोळ, प्रवीण कोेकाटे, डॉ. अंकिता शहा यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

विश्‍वविक्रम नोंदीसाठी प्रयत्न

यासंदर्भात शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी सांगितले की, प्रतिक्षा पाटील हिने अधोमुख श्‍वानासन ७५ मिनिट ४ सेंकद केले आहे.त्याचे व्हिडिओ,फोटो व इतर कागदपत्रे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या बेवसाईडवर अपलोड करुन गिनेस बुकमध्ये विश्‍वविक्रमाची नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरु असलेल्याचे सांगितले.

गावाचे ,शाळेचे नाव झळकणार जगाच्या पुस्तकामध्ये...

देशासाठी काही तरी करावे अशी माझी इच्छा होती. जगाच्या पुस्तकामध्ये आपल्या गावाचे, शाळेचे नाव असावे असे मला नेहमीच वाटत असल्याने मी आई-वडिल व शिक्षकांच्या मदतीने विश्‍वविक्रम करण्याचा प्रयत्न केला असून याची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नोंद होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com