बारामतीला भेट देऊन ग्रामीण विकासाचे काम पाहावेच - वेंकय्या नायडू

मिलिंद संगई
शुक्रवार, 22 जून 2018

बारामती - उपराष्ट्रपती झाल्यानंतर नायडू यांनी पहिल्यांदाच बारामला भेट दिली. त्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत नायडू यांनीही पवारांची स्तुती करत त्यांच्या ग्रामीण विकासाच्या कामाची माहिती प्रत्येक खासदाराने बारामतीत येऊन घ्यायला हवी अशी पावतीही दिली.  

माझ्या राजकीय प्रवासाच्या प्रारंभापासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे वेगळे संबंध आहेत. आमचे राजकीय विचार वेगळे असले ग्रामीण विकासाबाबत त्यांचे प्रेम, त्यांचा प्रॅक्टीकल दृष्टीकोन व सतत ज्ञान संपादन करण्याची त्यांची सवय या मुळे आमची मैत्री कायमच राहिली. अशा शब्दात उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी शरद पवारांशी असलेल्या स्नेहसंबंधाची मोकळेपणाने कबूली दिली. 

गेल्या चाळीस वर्षांपासूनच्या राजकीय प्रवासात आमचे पक्ष वेगळे असले तरी स्नेहसंबंध कायमच राहिल्याचा उल्लेख नायडू यांनी बारामतीत पत्रकारांसमोर बोलताना केला. 

गेल्या चार दशकात पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा झालेला सर्वांगिण विकास पाहून मी प्रभावित झालो, असे सांगत उपराष्ट्रपतींनी शरद पवार यांच्या व्हिजनचे कौतुक केले. विद्या प्रतिष्ठान व कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थांच्या माध्यमातून या भागाचा झालेला कायापालट हा सामान्य माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारा असल्याने हा विकास पाहून समाधान वाटल्याचे नायडू यांनी नमूद केले. 

बारामती पाहण्याची माझी इच्छा होती...
बारामतीचा विकास पाहण्याची माझीच इच्छा होती, दोन दिवस पुण्यात होतो त्या मुळे शरद पवार यांनी हा योग जुळवून आणल्याचे सांगत वेंकय्या नायडू यांनी त्यांच्याबद्दल आभार व्यक्त केले. 

Web Title: Visit Baramati to see the work of rural development - Venkayya Naidu