''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का '

download.jpg
download.jpg

पुणे :. 'अपयशाचे श्रेय नेतृत्वाने स्वीकारले पाहिजे' असे वक्तव्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले होते. याच विधानाचे 'कौतुक' करत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ''गडकरी साहेब सुरुवात स्वतःपासून कराल का ?'' असा सवाल खुल्या पत्रातून विचारत त्यांचा पाहूणचार घेतला. ''अनेक कामांचे श्रेय आपण गेल्या चार वर्षात घेतले आहे. तेव्हा या रखडलेल्या कामाच्या अपयशाचे श्रेय आपण घेऊन जे बोलतो ते करतो हे सोदाहरण दाखवून द्याल'' असा टोला देखील त्यांनी गडकरींना लगावला.  

या पत्रातून त्यांनी गडकरींच्या कामकाजातील अपयशाचा पाढा वाचून दाखवत ते म्हणाले, ''देहूरोड सातारा या १४० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० ला सुरु झाले. ते ३१ मार्च २०१३ ला संपायला पाहिजे होते. आता ३१ डिसेंबर २०१८ आला तरी, हे काम संपलेले नाही. या अर्धवट कामामुळे आजवर या रस्त्यावर शेकडो अपघात आणि डझनवारी बळी गेलेले आहेत. आजही अनेक ठिकाणी या रस्त्यावर डायव्हर्जनस् आहेत. त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि इंधन याची अपरिमित हानी होते आहे. ''

''आपल्या मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या कंत्राटदाराला सातत्याने मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. आपण गेल्या चार वर्षात दोन वेळा तरी या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची धमकी दिलीत. हे काम म्हणजे काळा डाग असल्याचे बोललात पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. या रस्त्यावरची टोल वसूली थांबवली तरच काम लवकर होऊ शकेल असे आम्ही अनेकदा सुचवून ही आपण हा धाडसी निर्णय मात्र घेऊ शकला नाहीत. या रस्त्याचे काम नक्की कधी पूर्ण होणार याची माहिती निदान आता तरी जनतेला मिळेल का ? असा प्रश्न त्यांनी गडकरींना केला.'' 
 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com