भटक्‍या विमुक्तांना धीर देण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

पुणे - राईनपाडा येथील हत्याकांडानंतर राज्यातील भटके विमुक्त भेदरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर झाला असून, त्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यासाठी १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान ‘भटके विमुक्त पंधरवडा’ पाळण्यात यावा व त्यांच्या प्रश्‍नांवर कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी विचारवंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पंधरवड्यादरम्यान भटक्‍या विमुक्तांच्या वस्त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. ‘शासन भटक्‍यांच्या पालावर’ हा कार्यक्रम राबवून त्यांना रेशन कार्ड, मतदान कार्ड, जातीचे दाखले देण्यात यावेत; तसेच त्यांची जातीनिहाय जनगणना करावी व त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करावा आणि राईनपाडा हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे, अशा मागण्या पत्रात केल्या आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. अनिल अवचट, डॉ. कुमार सप्तर्षी, दिनकर गांगल, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, सुभाष वारे, प्रज्ञा दया पवार, उल्का महाजन, डॉ. विश्‍वंभर चौधरी, हरी नरके, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, हेरंब कुलकर्णी आदींनी पत्र लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com