रोबोट करणार पाहुण्यांचा सत्कार

पुणे - व्होल्टा रोबोटसह विद्यार्थी आणि एमआयटीचे प्राध्यापक.
पुणे - व्होल्टा रोबोटसह विद्यार्थी आणि एमआयटीचे प्राध्यापक.

पुणे - एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करणाऱ्या व्होल्टा नावाच्या रोबोटची निर्मिती केली आहे. कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुष्प, शाल आणि श्रीफळ यांनी भरलेले ताट वहन करण्याचे काम हा रोबोट करेल.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (आयसीटी) मुंबईचे कुलगुरू डॉ. गणपती यादव आणि नॅकचे सहसल्लागार डॉ. देवेंद्र कवडे यांच्या हस्ते व्होल्टा रोबोटचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय,  कुलसचिव शिवशरण माळी, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. रजनीश सचदेव कौर, प्रिन्सिपल डॉ. किशोर रवांदे आदी उपस्थित होते. डॉ. सुदर्शन सानप आणि प्रा. अनुराग निमा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्‍सच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. विद्यार्थांनी तयार केलेला हा पहिलाच रोबोट आहे. या रोबोटचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही कार्यक्रमात पाहुण्याच्या सत्कारासाठी वापरता येऊ शकतो. पाहुण्याच्या स्वागतासाठी पुष्प, शाल आणि श्रीफळ यांनी भरलेले ताट वहन करण्याचे काम तो करेल. 

देवंश बाजवाला, जिगर गंत्रा, श्रृतम ओवळ, श्रीकांत वाघुले, मानस वाघचौरे, अभिन पैठणे, अथर्व नाईक, अमृता नायक आणि यश मोकाशी या विद्यार्थ्यांनी हा रोबोट बनवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com