राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करा : डॉ. शहा

डॉ. संदेश शहा
बुधवार, 17 एप्रिल 2019

- सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करावे

इंदापूर : येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, वासुपुज्य मुर्तीपुजक संघ तसेच श्वेतांबर स्थानकवासी जैन समाज संघाच्या वतीने जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात एकत्रित साजरी करण्यात आली. यानिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्रावक, श्राविकांना खिरापत, सरबत, पाणी वाटप करण्यात आले. भगवान महावीरांच्या जगा व जगू द्या, या तत्वाचे पालन करा. तसेच सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रीय हुमड जैन फेडरेशनचे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा व डॉ. सागर दोशी यांनी केले. 

नगराध्यक्षा अंकिता मुकूंद शहा, भगवानराव भरणे पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी मिरवणूकीचे स्वागत करून प्रतिमेस अभिवादन केले तर भाजपा शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, नगरसेवक श्रीधर बाब्रस, जमीर शेख यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.  

येथील शांतीनाथ मंदिरचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, संचालक शिरीन दोशी, अरूण दोशी, निलेश मोडासे यांच्या हस्ते श्री भगवंत मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्यानंतर श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर पासून पालखी मिरवणूकीस प्रारंभ झाला. त्यानंतर जुना पुणे सोलापूर महामार्ग, बालाजी पथ, शिवाजी चौक, मुख्यबाजारपेठ, नेहरू चौक, संभाजी चौकातून मिरवणूकीचा समारोप पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात करण्यात आला. यावेळी मिलींद दोशी, नितीन शहा, निशा बलदोटा, नम्रता शहा, राजश्री दोशी, सिना शहा यांच्या भगवान महावीर  जीवनकार्यासंदर्भात घोषणा लक्षवेधी ठरल्या.

पार्श्वनाथ मंदिरचे विश्वस्त अॅड. अशोक कोठारी, जीवंधर दोशी, श्रेणिक कासार, रमेश नाझरकर, संतोष मेहता, वासुपुज्य मुर्तीपुजक संघाचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, संचालक पारसमल बागरेचा व सुरेंद्र कांगठाणी, श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे धरमचंद लोढा, प्रकाश बलदोटा, जवाहर बोरा, संजय बोरा, सुनिल बोरा, सुकुमार दोशी, सुकुमार गांधी, महेंद्र गुंदेचा, वीरसेन एखंडे, पवन भालेराव, अरविंद गांधी, संकेत चंकेश्वरा, महावीर शहा हे मिरवणूकीत सहभागी झाले होते. पार्श्वनाथ मंदिरात भगवान महावीर यांचे जन्मकल्याणिक पुजा संपन्न झाली. त्यानंतर शहा सांस्कृतिक भवन मध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुत्रसंचलन शांतीनाथ उपाध्ये, सचिन उपाध्ये यांनी केले.

Web Title: Vote as National Duty says Dr Shah