मतदार जागृतीचा नारा बुलंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - हाती संदेश फलके... मतदार जागृतीच्या घोषणा आणि पत्रके वाटून मतदान करण्याचे आवाहन करणारे तरुण... असे चित्र मंगळवारी शहरात ठिकठिकाणी दिसून आले. या अभियानातून मतदार जागृतीचा नारा बुलंद करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पुणे - हाती संदेश फलके... मतदार जागृतीच्या घोषणा आणि पत्रके वाटून मतदान करण्याचे आवाहन करणारे तरुण... असे चित्र मंगळवारी शहरात ठिकठिकाणी दिसून आले. या अभियानातून मतदार जागृतीचा नारा बुलंद करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

परिवर्तन संस्था, पुणे महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार जागृती अभियान राबविले जात आहे. सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, वडगाव आणि हडपसर इत्यादी ठिकाणच्या महाविद्यालयांतील तरुण-तरुणी एकत्र येऊन मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करत आहेत. सातारा रस्त्यावर पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय; तर सिंहगड रस्त्यावर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. काशीबाई नवले इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सनसिटी भागात आणि फातिमानगर येथे विद्याभवन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संदेश फलकाद्वारे मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले. या अभियानात सुमारे 600 विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यांनी पाच हजार पत्रकांचे वाटप केले. 

अभियान 19 फेब्रुवारीपर्यंत 
या अभियानाला मंगळवारी सुरवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळात आहे. विद्यार्थ्यांच्या जनजागृतीमुळे नागरिकांनी मतदान करण्याचा निर्धार केला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये 19 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे तन्मय कानिटकर यांनी सांगितले. 

Web Title: Voter awareness