मतदारांत जनजागृती करा - सुनील अरोरा

व्हीव्हीआयपी विश्रामगृह - पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत (उजवीकडे) मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांचे स्वागत करताना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.
व्हीव्हीआयपी विश्रामगृह - पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत (उजवीकडे) मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांचे स्वागत करताना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.

पुणे - आगामी निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीशी संबंधित, तसेच ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण द्यावे. यासोबतच मतदार जागृतीसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्या. 

व्हीव्हीआयपी विश्रामगृहात पुणे विभागातील निवडणूकविषयक आढावा बैठक अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे शिरीष मोहोड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मोनिका सिंग, साताऱ्याच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पूनम मेहता, सांगलीचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल भोसले, सोलापूरचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सतीश धुमाळ यांच्यासह मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.  

डॉ. म्हैसेकर यांनी नवीन मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दर रविवारी आणि प्रत्येक मंगळवारी महाविद्यालयांमध्ये घेतलेल्या विशेष कॅम्पची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीसाठी सुमारे दोन लाख अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. 

दिव्यांग मतदारांना सुविधा पुरवा
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतदार नोंदणी संक्षिप्त पुनर्रिक्षण मोहीम २०१९अंतर्गत मतदार नोंदणी, दिव्यांग मतदार नोंदणी, ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक स्तरावरील तपासणी आणि त्याबाबत जनजागृती नियोजनाचा आढावा मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांनी घेतला. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com