जिल्ह्यात मतदारनोंदणीसाठी 68 हजार ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

मतदारनोंदणीसाठी येत्या शनिवारी (ता. 27) आणि रविवारी (ता. 28) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

पुणे - लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे 68 हजार जणांनी मतदारनोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत.

मतदारनोंदणीसाठी येत्या शनिवारी (ता. 27) आणि रविवारी (ता. 28) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

जिल्हा निवडणूक प्रशासनाने 15 जुलैला प्रारूप मतदार यादी जाहीर केली. मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष संक्षिप्त मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत चार हजार 881 अर्ज प्राप्त झाले होते.

यामध्ये 18 ते 19 या वयोगटांमधील एक हजार 85 हजार युवक-युवतींचा समावेश आहे. आता 27 आणि 28 जुलैला विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत नव्याने मतदारनोंदणी, नाव वगळणे, नावामध्ये दुरुस्ती आणि रहिवासी पत्त्यात बदल करण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील.

या मोहिमेत आलेल्या अर्जांची मतदारनोंदणी अधिकाऱ्यांकडून पाच ऑगस्टपर्यंत तपासणी करण्यात येईल. दावे आणि हरकती 13 ऑगस्टपर्यंत निकाली काढण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून 16 ऑगस्टपर्यंत मतदार याद्यांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter Registration Online Form