तुम्ही मतदान करु शकत नाही; तुम्हाला आधी चष्मा नव्हता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

कोथरुड मतदार संघात  मोरे विद्यालयात एक भलताच प्रकार समोर आला आहे. डोळ्यावर चष्मा असल्याने मतदाराला मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. याबाबत मतदार बाळू शिंदे यांनी तक्रार केली आहे. 

पुणे : कोथरुड मतदार संघात  मोरे विद्यालयात एक भलताच प्रकार समोर आला आहे. डोळ्यावर चष्मा असल्याने मतदाराला मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. याबाबत मतदार बाळू शिंदे यांनी तक्रार केली आहे. 

ओळखपत्रावरील फोटोवर चष्मा नव्हता मात्र, मतदान करण्यासाठी येताना बाळू शिंदे हे चष्मा घालून गेल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. बाळू शिंदे म्हणाले, "ओळखपत्रावरील फोटोवर चष्मा नाही, पण आता माझ्या डोळ्याला चष्मा असल्याने मला मतदान करू दिले नाही."

काही मतदान केंद्रावर तक्रारी असल्याचे पुढे आले. त्यामध्ये मतदान केंद्र बदलने, नावात बदल, फोटो चेहऱ्याशी जुळत नाही, अशा कारणांमुळे अनेक नागरिकांना मतदान करता येत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. मात्र, ते मतदानावर अडून राहिल्याने अधिकारी आणि मतदार यांच्यात वादाच्या घटना घडल्या. त्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने वादात भर पडली. त्यामुळे मतदारांना मतदानाविना परत जावे लागत असल्याचे चित्र पाहयला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A voter was not allowing to vote in kothrud for having specs

टॅग्स