भाजप नेत्यांकडून मतदारांचा अपमान : मुकुंद किर्दत

भाजप नेत्यांकडून मतदारांचा अपमान : मुकुंद किर्दत

पुणे : महाराष्ट्रातील आजच्या घटना या अत्यंत लज्जास्पद, आत्मकेंद्रित उलथापालथ आणि सर्व मतदारांचा अपमान करणारी आहे. भाजप नेत्यांनी मतदारांचा अपमान केला, असे आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

गुडलक चौकातील निषेधार्थ संदीप सोनवणे, डॉ अभिजित मोरे, सुभाष करांडे, सुहास पवार, राघवेंद्र राव, सुजय सेठ, महेश बिराजदार, अभिजित परदेशी उपस्थित होते. किर्दत म्हणाले, आपण नीतिमूल्ये गाडून टाकली आहेत, हेच आज सिद्ध केले आहे. संविधान आणि लोकशाहीचा या प्रस्थापित पक्षांना काहीही देणे-घेणे उरलेले नाही असे म्हणावे लागेल. यापूर्वी शिवसेना आणि भाजपने जनतेचा विश्वासघात केलाच आहे. आता भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीमुळे स्वार्थाच्या राजकारणाचा पुढचा टप्पा महाराष्ट्राच्या वाटेला आला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती व जनतेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांची, हे कुठल्याही टप्प्यावर या सत्तेसाठीची चर्चा होताना म्हणजे किमान समान कार्यक्रमात, कुठेही प्राथमिकता नव्हती असे स्पष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com