Loksabha 2019 : एकाच कुटुंबांतील मतदारांची दोन मतदारसंघांत विभागणी

Loksabha 2019 : एकाच कुटुंबांतील मतदारांची दोन मतदारसंघांत विभागणी

पुणे - पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघांच्या सीमेवरील कुटुंबांची विभागणी दोन मतदारसंघांत झाल्याचे आज आढळले. नातीगोती शोधून मतदानाचा आग्रह धरला जात असतानाच हा ‘कौटुंबिक दुरावा’ चर्चेचा ठरला.  

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरातील वारजे येथील ‘बायपास’जवळील आणि चांदणी चौकाजवळील वेदभवन परिसरातील काही गृहरचना संस्थांमधील कुटुंबांना हा ‘दुरावा’ अनुभवास आला. जो परिसर पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर आहे, अशा ठिकाणच्या सोसायट्यांमध्ये हा अनुभव आला. एकाच सोसायटीतील कुटुंबे दोन्ही मतदारसंघांत विभागली गेलेली तर आढळलीच; पण एकाच कुटुंबातील मतदारही दोन मतदारसंघांत विभागले गेलेले आढळले. पतीचे नाव बारामती मतदारसंघाच्या, तर पत्नीचे नाव पुणे मतदारसंघाच्या मतदार यादीत आलेले आढळले. एका कुटुंबातील प्रमुख व त्यांच्या मुलाचे नाव बारामती मतदारसंघात आणि पत्नी व सुनेचे नाव पुणे मतदारसंघात होते. एका ठिकाणी आई-वडील पुणे मतदारसंघात व मुलगा बारामतीमध्ये मतदार असल्याचे दिसले. गेल्या वेळी लोकसभा व विधानसभेला अनुक्रमे बारामती व खडकवासला मतदारसंघात असलेले मतदार या वेळी पुणे मतदार संघाच्या यादीत होते. काही ज्येष्ठ नागरिकांच्या नावांसमोर ‘डिजिटल’ असे नोंदवले गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com