Vidhan Sabha 2019 : प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्याने मतदारांचा आमदार तापकीरांना पाठिंबा

Vidhan Sabha 2019 : प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्याने मतदारांचा आमदार तापकीरांना पाठिंबा

सिंहगड रस्ता / खडकवासला : 'बीडीपी आरक्षणामुळे आमच्या घरांवर कारवाई होण्याची भीती होती. गावठाणावरील बीडीपी रद्द करण्याचा ठराव आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव तापकीर व वडगाव धायरीच्या नगरसेवकांनी प्रयत्न केले. आता आम्हाला कोणत्या कारवाईची भीती नाही. म्हणून आम्ही सगळे बीडीपीग्रस्त नागरिक आता महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. 

तसेच कोणत्याही आमिष, प्रलोभनाला बळी न पडता आमदारांनी आमची घरी वाचवली आणि त्यांच्याच पाठीशी राहणार असा निर्धार वडगाव बुद्रुक परिसरातील बीडीपी आरक्षण भागातील नागरिकांनी व्यक्त केला. 

आमदार तापकीर यांचा वडगाव बुद्रुक व आनंदनगर परिसरात दौरा असताना येथील रहिवाश्यांनी तापकीर यांचा सत्कार करून त्यांना पाठिंबा दिला. 

हरिदास चरवड, नीता दांगट, राजाभाऊ लायगुडे राजश्री नवले, अश्विनी पोकळे, मंजूषा नागपुरे, ज्योती गोसावी, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, दिलीपमामा चरवड, हेमंत दांगट, मनोहर बोधे, गंगाधर भंडावळे, नितीन वाघ, अमर चरवड, सचिन मोरे, जयसिंग दांगट, अमोल दांगट, संतोष गोपाळ, शहाजी वांजळे, माधव देशपांडे, बाळकृष्ण वांजळे, कल्पेश ओसवाल, सुप्रिया भूमकर, मनीष जगदाळे, प्रसाद गिजरे, पदयात्रेत सहभागी झाले होते.

आमदार तापकीर म्हणाले, की बीडीपी आरक्षण असलेल्या ठिकाणी 1983 च्या अगोदरपासून येथे नागरिक राहत आहे. आरक्षण चुकीच्या ठिकाणी टाकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. गावठाण असल्याने हे आरक्षण रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांची मागणी होती. तसा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. तर नव्याने  274 जणांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी महसूलमंत्री व सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत एक बैठकीत नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

तापकीर यांच्या माध्यमातून आम्हाला सिंहगड रस्त्यावर आनंदनगर चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे. वडगाव बुद्रुकला दोन कालव्यांच्यामध्ये गार्डन तयार केले. सेवा रस्त्याला साडेचार कोटी रुपये मिळाले. शहराचा इतर भागाप्रमाणे वडगाव खुर्द, धायरीला पाणीपुरवठा लवकरच अधिक सुरळीत होणार आहे.

नऱ्हे येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. नांदेडच्या कालव्यावर रुंद केला (चार नवीन पूल बांधले.) असे वडगाव धायरी व हिंगणे आनंदनगर येथील नगरसेवकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com