उमेदवारांच्या कॉल सेंटरनं पदवीधर मतदार वैतागले

Voters were annoyed by the graduate campaign
Voters were annoyed by the graduate campaign

पुणे : गेल्या दोन आठवड्यापासून पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणकीचा प्रचार सुरू असला तरी, आज (रविवारी) शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सकाळपासून कंबर कसली. दिवसभरात एकाच मतदाराला 'आमच्या उमेदवारास पसंती क्रमांक एक द्या' असे सांगणारे काॅल अनेक वेळा आल्याने, मेसेजचा भडीमार होत असल्याने मतदार वैतागून गेले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पदवीधर मतदार संघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह इतर छोट्या पक्षांचे, संघटनांचे उमेदवारही रिंगणात आहेत. या निवडणुकीत पुणे शहरात होणारे मतदान निर्णय ठरते, त्यामुळे येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी व आपल्या उमेदवाराचे नाव पदवीधर आणि शिक्षकांच्या लक्षात यावे यासाठी प्रचार यंत्रणा कामाला लागली होती. शहरात विविध ठिकाणी मेळावे घेण्यात आले, गाठीभेटींवरही भर देण्यात आला होता. मात्र आज रविवारचा शेवटचा प्रचाराचा दिवस असल्याने मतदारांवर मात्र फोन कॉल्स मेसेज रेकॉर्ड कॉलचा वर्षाव झाला. 

रविवारी सकाळपासून पदवीधर मतदार व शिक्षक मतदार यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कॉल करण्यास सुरुवात केली. आपल्या उमेदवाराचे नाव सांगत त्यांनी आत्तापर्यंत काय केले , पुढे काय काम करणार आहेत याची माहिती देत होते. तर हीच माहिती देणारे रेकाॅर्डेड काॅलही होते., काही उमेदवारांनी काॅल सेंटरच्या माध्यमातून मुला-मुलींना काॅल करण्यास लावले. तसेच व्हाट्सअप वर मेसेज, व्हिडिओ पाठविले, टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आले. 

फडणवीसांनी कष्टाने मिळवून दिलेले आरक्षण, या सरकारने टिकवलं नाही : चंद्रकांत पाटील

गेल्या काही दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान राबविण्यात आले नव्हते. मात्र, आज शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच उमेदवारांनी व त्यांच्या प्रचार यंत्रणेने प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी फोन कॉल्स पुरेपूर उपयोग करून घेतला. पण असे कॉल दिवसभरात येत राहिल्याने मतदार वैतागले.

पदवीधर मतदारसंघाचे मतदार असलेले अतुल पवार म्हणाले, गेल्या काही दिवसात आमच्या उमेदवारास मतदान करा असे सांगणारे मोजके कॉल आले होते. पण आज सकाळपासून जवळपास सर्वच उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेकडून मतदान  करण्यासाठीचे अनके कॉल आले. त्यातले काही रेकॉर्डिंग कॉल होते, मेसेज मोठ्याप्रमाणात आले आहेत. एकाच दिवशी एवढी प्रचाराच्या पाल्याने वैताग आला आहे."

सायंकाळनंतर छुपा प्रचार
''रविवारी सायंकाळी प्रचार करण्याची वेळ संपली तरी त्यानंतर मतदान होईल पर्यंत छुपा प्रचार सुरू असतो. यात जवळच्या लोकांना मेसेज करणे, फोन करणे, गाठीभेटी घेतल्या जातात.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com